Monday, June 22, 2009

स्वातंत्र्य

स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय? याचा अर्थ मला आज तोवर कळाला नाहिये. मागच्या पिढीचं एक ठिक आहे. त्यांच्या साठी गोऱ्यांपासुन मुक्ती म्हणजे स्वातंत्र्य होत. म्हणजे निदान दररोज राजकर्ते म्हणुन ते न दिसणे असा त्याचा आता अर्थ लावता येतो. पण माझा मुद्दा हा देशाबद्दलच्या स्वातंत्र्याचा नाहीच. मला स्वातंत्र्य वैयक्तीक पातळीवर शोधायचयं. मी शोधतोय देखील पण आश्चर्य ते हे कि प्रत्येक वेळेस मला ते मृगजळच  वाटते. 

जगण्यात सर्वात मोठं पारतंत्र्य म्हणजे विचारचं. आपल्या विचारांवरही आपला हक्क नसावा ह्यासरखा दुसरं दुर्दैव म्हणता येणार नाही. अगदी लहानपणी शाळेच्या निवडीपासुन छोट्या छोट्या निर्णयापर्यंत हे असच घडतं. कोणी म्हणेल, ह्यात वाद घालण्यासारखं काही नाही. मान्य. पण ह्यापैकी किती निर्णयांचा नंतर डोळसपणे विचार तरी होतो, हा मुद्दा. थोडक्यात काय तर जे विचारांचं तेच निर्णयाचं. आपले नेर्णय आपल्याला न घेता येणे हे पण अर्धनशिबीचं. मग तुमच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता असो वा नसो. तसं ही क्षमता तपासण्याची संधी पण ह्या पारतंत्र्यात मिळत नाहीच. आणि आपण कर्तेधर्ते झाल्यावरही हे चालुच असते. कधी सहकाऱ्याच्या, अधिकाऱ्याच्यारुपाने हे पारतंत्र्य आपल्या आयुष्यात डोकवतेच तर कधी निव्वळ आपल्या अनभिज्ञ्यतेमुळे
 हे घडते.

मग प्रश्न उरतो तो हा कि हे पारतंत्र्य लादत कोण? कोण आपल्या मनावर साम्राज्य करतो आणि आपल्याला ते आयुष्यभर कळतदेखील नाही? आणि ह्या पारतंत्र्याची आपल्याला इतकी सवय का झाली?

प्रश्न जितके कठीण उत्तरे तितकी सोपी असं कोणी  तरी म्हणलं आहे. पण ते काही इथे लागु पडत नाही हे उघड वाटते. तेव्हा माझा हा खुला सवाल आहे, ह्याला आपापल्या अनुभवानुसार आणि मान्यतेनुसार उत्तर कळवावे आणि माझ्या विचारांना दिशा द्यावी, ही विनंती.

1 comment:

  1. i think most of us are at the mercy of the society...most of the teenegers,seeking for a good carreer,opts for a subject which is considered 'hotspot' ;before trying to find out what really interests him...may be bcoz the surrounding imposes an idea on our minds about what is good or bad for us and we are not strong enough to follow our curiosity..i think 'we make ourselves dependent on others without knowing that we are ...'

    ReplyDelete