Friday, July 31, 2009

शनिवार रविवार

आधी शनिवार रविवार म्हणजे पर्वणी असायची...
शाळेला अर्धी बुट्टी आणि दिवसभर गप्पा गाणी असायची...
दुपारची शाळा अर्धाच दिवस सकाळी असल्याने शनिवार गंमतवार बनायचा...
शाळा संपल्यावर क्रिकेट, ढोली चा डाव रंगायचा....
रविवार मग अख्खा टी.व्ही. पाहण्यात जायचा....
रंगोली पासून मराठी चित्रपटापर्यंत एकूण एक कार्यक्रम रंगायचा...
नाहीच असं झालं तर नदीकिनारी सायकलीवर ट्रीप व्ह्यायची, निदान काही शंख शिंपले तरी जमायची....

आता सुद्धा शनिवार रविवार रंगतोच की...
पण येणाऱ्या वीकेण्डपेक्षा दगदगीच्या डेडएण्डचे अधिक अप्रूप असते...
आठवडाभर दिलेले शिव्याशाप मोजण्यातच अर्धा वेळ जातो, उरलेला मग नवीन व्यथा शोधण्यासाठी असतोच की...
शनिवारी रात्री लक्षात येतं की, काही तरी एक्साईटींग केले पाहिजे, पण सर्जनशीलतेला लागलेला शाप एका रात्रीत थोडाच जाणार असतो?
उरलेसूरले चैतन्य मग टी.व्ही.च्या रीयालिटी शो साठी कामी येते, असं करतं मग ती संध्याकाळपण जाते...
झोपताना परत विचार डोकवतो, ह्या वीकेण्डला तरी आपण काय नवीन केलं?
जमेच्या बाजुला फ़ार काही नसतं, असलचं तर आळसाचं भलं मोठ्ठं शून्य असतं.
येत्या वीकेण्डला मात्र असं नाही होवु द्यायचं, जे जे जमेल ते सर्व मनमूराद करायचं,
पण म्हणजे नक्की काय करायचं? हा प्रश्न कधीच सतावत नाही....कारण मनात सोमवारच्या नवीन टेंशनने पुन्हा आपलं डोकं वर काढलेलं असतं....