Monday, April 27, 2009

मला प्रचंड चीड आलीये...

मला प्रचंड चीड आलीये...
आपल्यांची परक्यांची , वॆळेची, काळाची...
मला प्रचंड चीड आलीये...
गर्दीची, शुन्यात पहाणाऱ्या लोकांची, पचा पचा थुंकणाऱ्या नालायकांची....
दर्याला आव्हान आजही देवु शकतो, नवीन क्षितीजे आजही शोधु शकतो...
पण मला प्रचंड चीड आलीये...
हतबल झालेल्या गलबताची, नेहमीच विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाऱ्याची....
परत परत तेच करताना होणाऱ्या दमछाकीची..मला चीड आलीये ह्या जीवनाची....
मला चीड आलीये...
मनात हो असतानाही नाही म्हणणाऱ्या प्रेमिकांची, चांगल्या असतानाही सुमार दिसणाऱ्या मुलींची,
मला चीड आलीये केवळ रस्त्यावरच सुंदर दिसणा~या युवतींची.....
दुसऱ्यांच्या आयुष्याला गालबोट लावुन निश्चिंत आणि बेजाबदारपणे ऐकणं टाळणाऱ्या नाकर्त्यांची.....
आशेचा किरण आजही दिसेल, असं दररोज वाटल्यावर, न उगवणाऱ्या सुर्याची मला चीड आलीये...
मला चीड आलीये हे असच का ह्या प्रश्नामुळे सतावणाऱ्या विचारांची....
मला प्रचंड चीड आलीये...ह्या सगळ्याची....
चीड आलीये.........मला माझीच..!!!

चीडलेला ...

20 comments:

  1. अमित,सही आहे !!! कविता/आत्मनिवेदन, काय म्हणू ?

    ReplyDelete
  2. भावना वैश्विक झाल्या़त बघा.

    ReplyDelete
  3. @ओंकार-
    आत्मनिवेदनात्मक कविता म्हण हवं तर...

    @No Nonsense:
    तुमचं display name आवडलं बघा....Shree ganesh झाला, आता पुढे काय? M watching!

    ReplyDelete
  4. congrats!! kavita awadli....!! plz continue bloggin!!

    ReplyDelete
  5. Amit
    Cheed cheed band kar ani pudhchi kavita lih patkan...;)

    This is a perfect verse for death metal kinda music... I'll encourage you to put some notes along with the words.

    ReplyDelete
  6. एन.ड्या (C'est Moi), Thankx for the words ...
    ज्या भावनांच्या विरेचनासाठी ह्या पंक्ती लिहिल्या गेल्या आहेत, मला म्हणावं लागेल, तुला त्या दिसल्यात पण तु त्यांना व्यवस्थित ओळखु शकला नाहिस...!

    ReplyDelete
  7. छान..अतिशय सुंदर कविता....म्हणूनच मी थोडसं धैर्याचं विधान करतोय!!
    सारस्वतांनो! जागे व्हा..मराठी साहित्य विश्वात "चौथ्या केशवसुतांचं" आगमन झालेलं आहे. अमितने लिहीलेली ही कविता जरी आत्मनिवेदनपर वा वास्तववादी असली तरी, त्याच्या स्वभावाच्या पूर्णपणे विरोधाभासात्मक आहे. म्हणूनचं आज पटलं...."प्रतिभा हि वेडाची बहिण आहे." नेणीवेच्या पातळीवर शोध घेताना कधी कधी फ़्रोइडचा कंदील सुद्दा अपुरा वाटायला लागतो. असो....
    दुसर्या महायुध्याच्या पार्श्वभुमीवर आलेली उगीचता, विफ़लता, शून्यता ज्या प्रमाने मर्ढेकरांना प्रेरित करते, अगदी त्याचप्रमाणे कदाचित आर्थिक मन्दी, राजकीय मूल्यहीनता आणि व्यवस्थेबद्द्लचा द्वेश अमितला ’चीडलेला’ सारखी कविता करायला प्रेरित करित असावी.
    परंतु, मी थोडासा आशावादी होऊन अमितला एवढचं म्हणॆन कि,
    'Hope is a good thing,
    May be the best of the things,
    and;
    good things never dies....'

    -माधव देशमुख

    ReplyDelete
  8. माधव what to say? तु छानच लिहिलयेस...पण केशवसुत वैगेरे जरा अधिकच झालं हं....हो एक मात्र नक्की की, भविष्यात कोणाला "दुसरे भोळे" म्हणुन ओळखले गेले तर माझा आक्षेप नसावा...असो, तो संशोधनाचा एक वेगळा विषय बनु शकतो.
    विरोधाभासाबद्दल लिहिणारा तु प्रथमच...! काय बोलु? तु मला निरुत्तर केलेस...
    वाऱ्यासंगे धावणाऱ्या वेडाच्या बहिणीला अडवणार तरी कोण? आणि कोणाला जर ते शक्यच झाले असते तर आपण फ़्रॉइड किंवा युंगऎवजी अशा प्रतिभावान लोकांनाच पुजनीय मानले नसते का?(तसे आताही मानतोच..पण त्यात प्रतिभेचा वाटा अधिक) नेणीवेचा उगम, नेणीवेची स्फुर्ती, नेणीवेचे गंतव्यस्थान...सर्वच अगम्य..!!!
    आर्थिक मंदि - हो, राजकिय मुल्यहिनता - नक्कीच, व्यवस्थेबद्दल द्वेश - निश्चित...पण ह्या सर्वांसोबत समष्टीतील हरपलेल्या व्यक्तीचा विचार नक्कीच प्रेरणास्थानी दडलेला आहे. आणि Andy ने Red ला सांगितलेले शब्द जितके तुला प्रेरणा देतात तितकेच मलाही...
    मित्रा, जिंकलस कि!

    ReplyDelete
  9. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  10. Madhav,,,tujhya tip la mi 20 paike 14 mark denar bagh!! aapan ek overall vichar karuya!!sagla cover jhala aahe..pan thodasa ajun kuthe tari...EK POINT.tu miss kela aahes!!! amit la mahit aahe kadachit!! hahaha

    ReplyDelete
  11. mala kavita awadali karan ti eka samanya manasachi bhavana vyakata karate samanya vyakati vkyati ani thoda samaj pahatat.. tasach ahe...chid samajachi ani nanter tyachach ek ghatak asanarya swtachi ahe...he aswasthatecha shatak manala jata..pan amitchya kavitet kewal chid itar ani ajubajuachya goshtichi nahi ti swatah baddalahi ahe...kadachit tya mule to stvik santap tharu shakel...ashi chidchid badalachi suruwat tharel..vanz tharnar nahi..tuze chidalepan tuzi samvedanshilata dakhawate tich pratibhe pekasha mala lekhanachi suruwat watate....tuchya aswasthatela shabda milot ya shubhechchan saha..
    chitra

    ReplyDelete
  12. चित्रा, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..!!
    बऱ्याच वर्षापासुन मला एक प्रश्न पडे, एखादी कविता कोणाला का सुचावी? अर्थात उत्तर अजुनही सापडले नाहि पण ही कविता लिहुन त्या उत्तरा च्या दिशेने एक पाउल पुढे सरकलो एवढे मात्र नक्की.
    कोण्याएका कवीने म्हटल्याप्रमाणे कविता लिहिल्यावर तो खुप दमतो, शिणतो आणि झोपी जातो..तो का ह्याचे उत्तर मला हळुहळु उमगु लागले आहे.
    संवेदनशिलतेबद्दल बोलायचे तर एवढच सांगेन कि, Wordsworth ने म्हटल्याप्रमणे कविता ही"the spontaneous overflow of powerful emotions" आहे आणि मी केवळ त्या emotions ना प्रामाणिक राहिलो आहे..
    आणि असच असल्याने कदाचित समजाबद्दलच्या ऋणांची जाणीव त्यात दिसणे अपरिहार्यच होते.
    तु म्हटल्याप्रमाणे प्रतिभेपेक्षा ही लेखनाची सुरुवात ठरो हिच माझी पण इच्छा!

    ReplyDelete
  13. अरे बापरे,
    मराठी वाङमयाचा वर्ग चालू आहे असं वाटतय.

    sanhite sobatach samiksha dekhil suru zaaliy.
    good one !!

    ReplyDelete
  14. PANDURANG SANGVIKAR YANCHE EK BANDHU JE GAVCHYA YATRET HARAWALE HOTE TE AAJ PRAGAT ZALE AHET:):)amit KAVITA MHANJE EKDAM SHATKAR THOKALA TU.KAVITE CHE VISHLESHAN JASTA KARUN TUJHYAVAR SAMIKSHA KANCHE FALTU SANSKARAN TALTO ANI DUSARI BHITI TYA madhav CHI.AAGE BADHO.'CURIOUS CASE OF amit bhole'

    ReplyDelete
  15. अभि, धन्यवाद! २०-२० सुरु आहे...षटकार तर पडणारच..! आणि Curious case का रे बुवा?

    ReplyDelete
  16. Try meditation....it'll surely help....

    ReplyDelete
  17. Thankx Adit. But I am not seeking any help!!!

    ReplyDelete
  18. sahi bhidu,keep it up

    ReplyDelete
  19. some "Heavy Metal" out there...very interesting mixture of feelings and thinking(my perception)....keep going..i really admire your expressive capacity and ability.

    ReplyDelete
  20. Thankx 4 ur views...the poem got published in one of the diwali ankas this year....!

    ReplyDelete