Tuesday, November 2, 2010

मी


जीवनाच्या गोंधळात मी एकटा
कोण आहे मी काय सापडणार मला वाटा
कोठे एकदा कोणी भेटल्यावर
करता येते मन मोकळे
तो क्षण सरल्यावर आपण आपले

Thursday, February 18, 2010

मैत्री

मैत्री म्हणजे एक त्रास...
कधीही काहीही करवणारी...!!!

एकाला बोललो की दुसर्‍याला झोम्बणारी,
भांडायला सदैव तयार ठेऊन वेळेवर रक्तदेखील काढणारी,
मैत्री म्हणजे एक त्रास...!!!

एका मुलीवरुन रुसवा आणणारी,
वेळेवर त्याच मुलीला डावलून दारूच्या ग्लासातून नाते द्रुढ करणारी,
मैत्री म्हणजे एक त्रास...!!!

एका भेटीसाठी कामे बाजूला पाडणारी,
मग अख्खा वेळ इकडे तिकडे भटकून वेळेचेच भान विसरवणारी,

मैत्री म्हणजे खरच एक त्रास...!!!


(ह्या सृजनाला कारणीभूत असणार्‍या तिघांना: बालमान, सुज्या आणि शेंडे )