मला प्रचंड चीड आलीये...
आपल्यांची परक्यांची , वॆळेची, काळाची...
मला प्रचंड चीड आलीये...
गर्दीची, शुन्यात पहाणाऱ्या लोकांची, पचा पचा थुंकणाऱ्या नालायकांची....
दर्याला आव्हान आजही देवु शकतो, नवीन क्षितीजे आजही शोधु शकतो...
पण मला प्रचंड चीड आलीये...
हतबल झालेल्या गलबताची, नेहमीच विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाऱ्याची....
परत परत तेच करताना होणाऱ्या दमछाकीची..मला चीड आलीये ह्या जीवनाची....
मला चीड आलीये...
मनात हो असतानाही नाही म्हणणाऱ्या प्रेमिकांची, चांगल्या असतानाही सुमार दिसणाऱ्या मुलींची,
मला चीड आलीये केवळ रस्त्यावरच सुंदर दिसणा~या युवतींची.....
दुसऱ्यांच्या आयुष्याला गालबोट लावुन निश्चिंत आणि बेजाबदारपणे ऐकणं टाळणाऱ्या नाकर्त्यांची.....
आशेचा किरण आजही दिसेल, असं दररोज वाटल्यावर, न उगवणाऱ्या सुर्याची मला चीड आलीये...
मला चीड आलीये हे असच का ह्या प्रश्नामुळे सतावणाऱ्या विचारांची....
मला प्रचंड चीड आलीये...ह्या सगळ्याची....
चीड आलीये.........मला माझीच..!!!
चीडलेला ...